अधिक माहिती

कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्दिष्ट

1) डिजिटल काळात येणाऱ्या अडचणी खुप वाढत असल्यामुळे एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण
खुप महत्त्वाचे आहे.
2)जेष्ट फोटोग्राफर (वडीलधाऱ्या) लोकांनी केलेली मेहनत लक्षात ठेवून.
3)व्यवसाय करत असतांना समाजाचे काही देणे लागते .

सहज सुचलेल्या विचाराने अवघ्या महाराष्ट्रातील फोटोग्राफी इन्डस्ट्रीमधील कलाकार एका ठिकाणी कसे भेटु शकतील हा ध्यास डोळ्यासमोर ठेवुन २०१८ च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही सोशल मीडियाद्वारे एक पोष्ट टाकली. काही मित्रांना फोन केले आणि मुक्ताईनगर तालुक्यातील आडवाटेवर असलेल्या निसर्गरम्य व आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या चारठाणा या ठिकाणी येण्याचे आव्हान केले आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हातील ४५० पेक्षा जास्त फोटोग्राफर व फोटो इन्डस्ट्रीमधील कलाकार मैत्री सोहळ्यासाठी एकत्र आले.
८ सप्टेंबर २०१९ रोजी घेतल्या मैत्री सोहळ्याचा आयोजनसाठी चार जणांची असलेली टिम अकरा जणांची झाली आणि २०१९ला चारठाण्यालाच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातुन १२०० पेक्षा जास्त मित्रांनी या मैत्री सोहळ्याला आपली हजेरी लावली.आपल्या देशातील फोटो इन्डस्ट्रीच्या व्याप खुप मोठा आहे. प्रत्येक जण या फोटोग्राफीच्या क्षेत्रात आपले कसब दाखवुन खुप सुंदर काम करित आहे. आपण सातत्याने महाराष्ट्रात आणि देशभर फिरत असतो. आपल्या काही मित्रांच्या भेटीही होतात पण आपण त्यावेळी कामात असतो.त्यामुळे विचारांची आदान प्रदान होवु शकत नाही.म्हणुन हा मैत्री सोहळ्याचा घाट…उद्देश फक्त आपली गाठ व्हावी..दोन शब्द आपुलकीचे अन प्रेमाचे…सोबत दोन घास भाजीभाकरी…

0

सहभागी

0 +

वरिष्ठ उपस्थिती

0 +

मदत निधी दान